२०१२… अजून काय???

काल संध्याकाळी ऑफिसमध्ये पोचलो आणि नेहमीप्रमाणे ईमेल चेक करत बसलो. कामाचा प्रचंड कंटाळा आला होता (तो नेहमीच येतो म्हणा). एक नियम नेहमी पाळतो, क्लायंटचे ईमेल सगळ्यात शेवटी चेक करतो. साले एक से एक मनहूस असतात, कारण त्यात नेहमीच एक चर्चा असते टार्गेट्स..टार्गेट्स आणि टार्गेट्स.

म्यानेजरचा पहिला ईमेल बघितला, त्याला हाय प्रायोरीटी असं मार्क केलं होतं. ***ATTENTION*** म्हटलं झालं, काही तरी नवीन जबाबदारी दिली असणार. रागातच तो ईमेल उघडला आणि त्यात सूर्याचे काही फोटो दिले होते. म्हटलं आता काय झालं?

त्यात त्यांनी एक बातमी दिली होती -

(CNN) The largest solar storm for seven years is expected to send a shower of radioactive solar particles racing towards Earth at almost 1,400 miles a second this week, according to NASA.  The flare, caused by a huge eruption on the sun’s surface on Sunday, is expected to affect GPS systems and other communications when it reaches the Earth’s magnetic field on Tuesday..

Solar flares are our solar system’s largest explosive events and can last from minutes to hours, according to NASA, releasing up to a billion tons of matter in the process. NASA says the flare may also spark an unusually large display of auroras, which may be visible at lower latitudes than normal. The dazzling array of brightly colored lights, known as the Aurora Borealis or Northern Lights, can frequently be seen in northern Canada, and the far north of Europe, from Greenland to Iceland and Norway.

This week’s powerful solar storm has already seen the lights visible as far south as Scotland, Northern Ireland and Yorkshire, in northern England.

मग त्यांनी नासा ने काढलेले फोटो दिले होते आणि एक यादी होती आमच्या सॅटेलाईटस् ची, ज्यांच्या द्वारे आम्ही आमच्या कस्टमर्सना आणि जगभरातल्या सैनिकांच्या नेटवर्कला सुविधा पुरवत असू. त्यात पुढे म्हटले होते की, पुढचे ७-८ दिवस हे जीपीएस, मोबाईल आणि सॅटेलाईट इंटरनेट सर्विसेस पुरवणाऱ्या कंपन्यांना कठीण आहेत आणि ह्या सुविधा काही काळासाठी बंद होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला खूप तक्रारी येतील, त्यांना हे नीट समजावून सांगा.

Solar Flare

Solar Flare

मग ह्या बद्दल थोडं गुगलून बघितले, आणि खालील माहिती सापडली. जाणकारांनी अजून माहिती दिल्यास बरं होईल.

आता हे सोलार स्टॉर्म/सोलार फ्लेअर नक्की काय?

ही एक प्रकारची नैसर्गिक खगोलीय घटना आहे, जी सूर्याच्या पृष्ठभागावर घडते. एक प्रकारचे वादळंच म्हणा सोप्या शब्दात. अशी वादळे तिथे होतंच असतात, पण जेव्हा मोठ्या प्रमाणावर अश्या प्रकारची घटना घडते, तेव्हा सूर्य नेहमीपेक्षा ६-७ पट उर्जा उत्सर्जित करतो. नासाने सांगितलं आहे की, २००५ मध्ये अशी घटना घडून गेली आहे, पण त्याचा जास्त परिणाम पृथ्वीवर झाला नाही. शास्त्रीय भाषेत ह्याला कोरोनल मास इजेक्शन (Coronal Mass Ejection – CME) असे म्हणतात.

आपण किती चिंता करायला हवी?

ह्यावेळी किमान २८ तासापूर्वी अशी प्रचंड वादळे सूर्याच्या पृष्ठभागावर घडलेली नासाने आणि  International Space Station मधल्या अवकाश संशोधकांनी बघितली आहेत. ह्या घटनेमुळे  सोलार पॅनलमध्ये अगणित उर्जा उत्सर्जित झाली आहे. ही उर्जा मोजणे अशक्य आहे. कारण जोपर्यंत ह्या उर्जालहरी आपल्या वातावरणावर आदळत नाहीत, तोपर्यंत ह्यांची तीव्रता कळत नाही. त्यामुळे थोडे चिंतेचे वातावरण सगळ्या संशोधकांमध्ये आहे. पण इतकं नक्की की, ही तीव्रता सूर्याच्या आत्ताच्या उर्जेच्या ६-७ पट असू शकते.

ह्यामुळे काय परिणाम होणार?

ह्या घटनेचे दुष्परिणाम जास्त करून सॅटेलाईट कम्युनिकेशनला पडू शकतो. पृथ्वीवरील मोबाईलसेवा, इंटरनेटसेवा आणि विमानांना दिशा दाखवणारी यांत्रिक सुविधा थोड्यावेळासाठी बंद होईल. त्यामुळे धृवीय भागातील विमान उड्डाणे बंद होतील, किंवा त्यांचे मार्ग बदलले जातील. सुरक्षेच्यादृष्टीने अमेरिकेतील काही भागात वीजपुरवठादेखील खंडीत केला जाईल. जर ही तीव्रता खूपंच जास्त असेल तर, सॅटेलाईट बंद पडून, गुरुत्वाकर्षणाअभावी पडू देखील शकतात.

ह्या आधी अश्या घटनेमुळे पृथ्वीला काही अपाय झाले आहेत का?

१९८९ – २००१ मध्ये आलेल्या सोलार स्टॉर्म/सोलार फ्लेअरमूळे अमेरिका आणि कॅनाडा भागात ब्लॅक आऊट झाला होता. जेव्हा ही उर्जा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते, तेव्हा तुम्हाला आकाशात विचित्र रंगछटा दिसतात. युरोपात आणि उत्तर अमेरिकेत हे बुधवारी आढळून आले आहे. त्याचे फोटोदेखील प्रसिद्ध केलेले आहेत नासाच्या वेबसाईटवर. भारतात अजून ह्याचे परिणाम जाणवले नाहीत, किंवा सांगितलेले नाहीत.

काल झालेल्या सोलार स्टॉर्मचा हा व्हिडिओ -

बघू पुढे काय होतंय….. :(

नासाच्या लिंकवर तुम्हाला ह्या बद्दल अजून माहिती मिळेल –  http://www.nasa.gov/mission_pages/sunearth/news/classify-flares.html

http://www.nasa.gov/mission_pages/sunearth/news/News012312-M8.7.html

विकिपीडिया माहितीचा दुवा  - http://en.wikipedia.org/wiki/Solar_flare

सर्व फोटो साभार सीएनएन आणि नासा

- सुझे !!

हुश्श्श… संपले एकदाचे ..

हुश्श्श… संपले एकदाचे… खरंच एकदाचे हे वर्ष संपले. अनेक चांगल्या-वाईट घडामोडींचे हे वर्ष, कधीच विसरता येणे शक्य नाही. पहिले सहा महिने कसे गेले कळलंच नाही. नुसती भटकंती, नवीन हापीस सगळं सगळं कसं सुरूळीत सुरु होतं. मग… मग अचानक अश्या घडामोडी घडत गेल्या, की त्यानंतर येणारे प्रत्येक दिवस मोजूनमापून जावू लागले…. पण आता बाप्पा कृपेने सगळं व्यवस्थित सुरु आहे.

ठरल्याप्रमाणे गड-किल्ले भटकंती हे विशेष टार्गेट ठरलं होतं, आणि त्यानुसार एकदम धुमधडाक्यात किल्ले मोहिमा सुरु झाल्या. ह्यावर्षीचा पहिला मॉन्सून ट्रेक सेनापतीं बरोबर करून, मस्त सुरुवात देखील झाली. तसेच ब्लॉगर ट्रेकच्या दुसऱ्यावर्षाची परंपरा कायम ठेवली गेली. त्याच दिवशी भविष्यात ट्रेक आयोजित केले जातील. सॉलिड धम्माल मज्जा सुरु होती. सुरुवातीच्या ५-६ महिन्यात जवळजवळ ११ किल्ल्यांना भेटी

तसेच सगळ्यांत महत्वाचे म्हणावे तर, ब्लॉगर्स मेळाव्याचे आयोजन करण्याची संधी मिळाली. ज्या ब्लॉगने मला रक्ताच्या नात्यांहून प्रेमळ अशी नाती दिली, त्याचं ब्लॉगर्स मित्रांना एकत्र आणायची जबाबदारी खांद्यावर पडली. विशुभाऊ, महेंद्रकाका आणि कांचनसोबत एका अभूतपूर्व सोहळ्याची तयारी करताना खूप छान वाटलं. पहिल्या मेळाव्याला रोहन, महेंद्रकाका आणि कांचन ने, किती मेहनत घेतली असेल ह्याची कल्पना आली. एका कार्यक्रमाचे आयोजन करणे ही खायची गोष्ट नाही हे कळून चुकले आणि खूप काही नवीन शिकायला मिळाले.

नंतर… बाबांना हृदयविकाराचा झटका आला आणि माझं आयुष्य एकदम बदलून गेलं. असं वाटत होतं, की अशी परिस्थिती कोणावरही येऊ नये. आयुष्याला एकदम ब्रेक लागला आणि त्यांच्या काळजीने दोन महिने अक्षरशः घरात बसून होतो. त्यांच्यावर जेजे हॉस्पिटलमध्ये अॅन्जिओप्लास्टी केली आणि आता एकदम ठणठणीत बरे झालेत… पण खूप पथ्यपाणी सुरु झाली… कधीकधी खूप वैतागतात, पण माझं सगळं ऐकतायत. एक वेगळे बाबा मला बघायला मिळाले गेल्या काही महिन्यात. काय माहित, पण त्याचं वागणं खुपच बदललंय. त्यातल्यात्यात ते खुश असतात, आणि नियमित ऑफिसला जातात जी जमेची बाजू.  God Bless Him :)

ह्याकाळात HP ने त्यांचे पीसी युनिट जगभर बंद करायचे ठरवले आणि नवीननवीन प्रोजेक्टवर काळाची गदा आली. पुन्हा मायग्रेशन प्रोसेस सुरु झाली..रोज नवीन नवीन म्यानेजरला इंटरव्ह्यू द्या…सगळं सगळं कटकटीचे काम मागे लागले. एके ठिकाणी तर मला पहिल्या राउंड्लाच बाहेर काढले आणि म्यानेजरला स्वतःला धक्का बसाला होता…. तो माझं सांत्वन करायला लागला, दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये बघ म्हणून…. मला पण धक्का बसला होता, पण काय करणार….नंतर चौकशीअंती कळले की माझ्या लॉगिन डिटेल्स चुकीच्या होत्या आणि माझ्या नावावर दुसऱ्या मुलाचे मार्क्स अपलोड झाले होते आणि शेवटी त्याचं प्रोजेक्टमध्ये माझं सिलेक्शन झालं… ;-) (एकदम फिल्मी वाटतंय… पण हे खरंय )

ह्यावर्षात ब्लॉगवर फारसं लिखाण झालं नाही… ह्याला कारण च्यामारेकीच्या सिरिअल्स आणि सिनेमे… हेरंब आणि आप्पा ने असं काही व्यसन लावून दिलं, की तासनतास पीसीसमोर बसून सिनेमे आणि सिझन्स सुरु झाले. बझ्झच्या बझ्झ चर्चेने पडू लागले. एकमेकांना रेकमेन्डेशन्स दिल्या गेल्या आणि इंटरनेटचे बिल वाढत गेले, पण ती हौस सुद्धा वाढत गेली… ;-)  आज विभीने इटलीला जायच्या आधी १४० जीबीच्या सिझन्सचा खजिना देऊन ठेवला आहे. तो संपेपर्यंत बघू काय होतंय.

माझा स्वतःचा ब्लॉग दोन महिन्यांनी उघडतोय (इथे अजिबात सांगायचा प्रयत्न नाही की, म्या कामात बिजी वगैरे आहे… कं हेच कारण आहे) बघू पुढे जितकं लिहायला जमेल तितकं प्रामाणिकपणे लिहायचा प्रयत्न केला जाईल. तुम्हा सर्वांचा लोभ असाच राहू द्या.

सध्या इतकंच….ह्या वर्षात अनेक मित्र मिळाले आणि खूप दुरावले. जे आहेत त्यांना जपणे इतकंच माझ्या हातात आहे. अजुन काही लिहायला सुचत नाही. घोटाळे आणि सरकार ह्यावर लिहायची वेळ नाही… असो आज त्यांना सुट, त्यांचा यथेच्छ समाचार नंतर घेतला जाईल… ;-)

ह्या सरत्यावर्षाच्या काही आठवणी….   :)   :)

This slideshow requires JavaScript.

!!! सर्व मित्रांना इंग्रजी नववर्षाच्या शुभेच्छा  - Wish you and your family a happy new year !!!

PS -

१. गेल्यावर्षीच्या संकल्पांबद्दल विचारणा करू नये… ह्यावर्षी नो संकल्प ..  :)

२.  लग्न अथवा तत्सम गोष्टी असलेल्या कमेंट्स स्पॅम करण्यात येतील, याची नोंद घ्यावी  :D

– (चिअर्स) सुझे !!!   :)   :)