३१ डिसेंबरला ठरलेला नाइट ट्रेक प्लान पूर्णत्वाला गेला नाही. खूप वाईट वाटल होत. ठरवलेल होत नव्या वर्षाची सुरूवात एका ट्रेकनेच झाली पाहिजे. पण…नाही जमल
मग विचार केला निदान पहिला वीकेंड तरी एखाद्या किल्ल्यावर जाव. शांत थोडावेळ निवांत कुठल्यातरी गडाच्या तटबंदीवर, उंच टेकडीवर बसाव आणि डोळे बंद कराव आणि मोठा श्वास घ्यावा. मग ठरवल की ३१ च्या रात्री करायचा ट्रेक रविवारी २ जानेवारीला करायचा. गड ठरलाच होता माहुली (आसनगाव जवळ)
किल्ले माहुली, मुंबई-नाशिक हाय वे जवळ आहे. मुंबईहून इथे लोकल ट्रेनने येता येत किवा हाय वे वरुन. ट्रेनने सेंट्रल रेलवेच्या आसनगाव स्टेशनला उतरून एसटीने किवा रिक्षाने माहुली गावापर्यंत पोहचता येत. ते अंतर अंदाजे ६ किमी आहे. गावात असलेल्या गीताभारती मंदिराच्या मागून किल्ल्याकडे जाण्याची पायवाट आहे. सगळीकडे मार्किंग्स असल्यामुळे रस्ता शोधायला कष्ट घ्यावे लागत नाहीत. मंदिराच्या इथूनच किवा ट्रेनमधूनच तुम्हाला प्रसिद्ध नवरा, नवरी आणि भटोबा सुळके दिसतील.
ह्याच किल्ल्यावरुन येणारा एक प्रसिद्ध धबधबा आहे. जिथे वॉटर रॅपल्लिंग केल जात. मी १० ऑगस्ट २००८ ला तिथे गेलो होतो, पण किल्ल्यावर गेलो नव्हतो. त्यामुळे आज किल्ल्यावर जाण्याचा योग आला होता ह्यातच समाधान होत. रोहन आणि अनिशने सांगितल्याप्रमाणे अपेक्षित गर्दी होती. खूप जण आम्हाला वाटेत भेटले.
गड चढायला सोप्पा आहे पण ते चढून जाण्याचा अंतर खूप जास्त होत. गेले ३ महिने ट्रेक बंद असल्यामुळे खूप दमछाक होत होती. लाल माती आणि त्यावर असलेले ते गुळगुळीत गोटे आम्हाला खूप वेळा पाडण्याचे प्रयत्न करीत होते. शेवटी वाटेत थांबत थांबत वर पोचलो. शेवटची शीडी चढून आम्ही गडाच्या माथ्यावर पोचणार याचा खूप आनंद झाला. तिथेच बाजूला असलेल्या एका मोठ्या दगडावर मांडी घालून बसलो, डोळे मिटले आणि उघडून त्या दरीत डोकावलो आणि आपण केलेल्या परिश्रामाचे चीज झाले असा म्हणून मनोमन सुखावलो
सगळा थकवा नाहीसा झाला. एक वेगळाच उत्साह अंगी संचारला. तिथे दोन तीन ग्रूप्स आधीच आले होते. त्यांनी आम्हाला सांगितल कसा आणि कुठे जायच.
थोड अंतर चालताच डाव्या बाजूला पाण्याच एक टाक आहे, पण ते पाणी पिण्याच्या लायकीच नाही. आम्ही त्या गार गार पाण्यात हात पाय धुवून मस्त फ्रेश झालो. गडावर झाडी खूपच वाढली आहे आणि त्यात पायवाट चुकण्याची खूपच शक्यता होती. मग आम्ही महादरवाज्याकडे निघलो. तिथे उर्दू शिलालेख आणि शिवलिंग बघितले. इथे जे पाण्याचे टाके आहे त्यात एकदम स्वच्छ आणि थंडगार पाणी असत. “पण तिथुनच बाजूला असलेल्या महादरवाजा आणि देवड्या यात प्रचंड घाणीच साम्राज्य होत. पिशव्या, उरलेल जेवण, हाड्, थर्मकोलच्या प्लेट्स… रोहन बोलला त्याप्रमाणे हा पिकनिक स्पॉट आहे याची खात्री पटली.”
मग आम्ही थोड खाउन घ्यायच ठरवल. सगळ्यांत स्पेशल डब्बा होता “ज्यो”चा, मस्त गाजराचा हलवा. मग आम्ही तो डबा एक एक घास करत खाउ लागलो. नो डाउट मी आणि दीपक ने जास्त ताव मारला त्यावर, कारण तो खरच खूप छान झाला होता. मग तिथून आम्ही निघालो भंडारगडाकडे. मध्ये एक जुनाट मंदिर/वाडा बघितला, त्यात मध्यभागी एखादी मूर्ती असावी पण सगळी पडझड झाली होती. समोरच एक छोट तळ आहे तिथून पुढे दहा मिनिटे पुढे चालत गेलो की भंडारगड सुरू होतो एक दरी ओलांडून पुढे गेलो की पुढे नवरा, नवरी आणि कल्याण दरवाजा, पण तिथे आम्ही जाउ शकलो नाही कारण आमच्याकडे रोप नव्हता.
नवरा, नवरीला दुरुनच शुभेच्छा देत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.
गड चढायला तीन साडे तीन तास लागले पण आम्ही एक तास ४५ मिनिटात उतरून खाली आलो. मस्त हॅण्डपंपवर हात पाय धुवून गरमागरम पोहे आणि चहा मारला
आणि मग घरी आलो १० ला.
२०११ मधला हा पहिला ट्रेक. आशा करतो की असे नवनवीन किल्ले ह्या वर्षात फिरता येतील.
काही फोटोज:
This slideshow requires JavaScript.
एक विनंती:
महाराजांच्या कारकिर्दीची साक्ष देणारे हे किल्ले आपला इतिहास त्या अभेद्य तटबंदीतून ताठ मानेने सांगतात, भरभरून बोलतात. फक्त तो इतिहास ऐकायची इच्छाशक्ति हवी. पिकनिक करायला रेसॉर्टस, हॉटेल्स पडली आहेत. तिथे हवा तो धुमाकूळ घाला पण किल्ल्यावर नको. अश्या किल्ल्याच पावित्र्य जपण आपल कर्तव्य आहे. कस वाटत असेल महाराजांना आपल्या किल्ल्याची अशी दुरवस्था पाहताना? ज्या किल्ल्याच्या रक्षणासाठी हजारो मावळे लढले, जिवाच रान केल. तिथे आपण साधी स्वच्छता पण राखु शकत नाही. ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. असा नका करू, विनंती करतो.
— सुझे
मस्त झालीय post.
थॅंक्स मित्रा
छान झाले आहे मित्रा
थॅंक्स महेश
सुहास छान झाली आहे पोस्ट. मी हा ट्रेक मिस केला रे
शेवटी केलीली विनंती खूप महत्वाची आहे.
पुढल्या वेळेस मी नक्की येणार
अरे .पुढल्यावेळीस नक्की जाउ रे.. आणि गडावर वातावरण खूपच वाईट होत रे. वाटला होत द्यावा दम पण आज आपण गेल्यावर परत तसाच होणार. कोणाच लक्ष नाही आहे ह्या गोष्टीवर ह्याचच वाईट वाटत रे
नववर्षाची सुरवात तर छान झालीये …..
होय सपा नक्कीच
चला सुरुवात तर दमदार झाली आहे…या वर्षात दणदणीत ट्रेक होतील अशी आशा करु या…शेवटची विनंती अगदी बरोबर आहे.
होय योगेश्वरा
जमेल तितके नक्कीच करू. धन्स रे
प्रेरणादायी बटाटा भजीचा उल्लेख नाही. ह्या पोस्टची दुसरी आवृत्ती काढ आणि बटाटा भजीच्या दोन ओळी वाढव.
पोस्ट आणि ट्रेक मस्त. मी फार किल्ले फिरलेलो नाही रे. तुम्हा सगळयांचे अनुभव वाचून हे सगळं फार मिस करतो. पाहू पुण्याला शिफ्ट व्हायला मिळालं तर किल्ले भटकंती होईल.
तुझी शेवटची विनंती चांगली आहे पण लोकं अशी सांगून सुधारणारी नाहीत. त्यांना जिथल्या तिथे हाणायला पाहिजे.
अरे मुद्दाम तो उल्लेख टाळला रे
तू ये की इथे आपण करू तुझ्यासाठी खास ट्रेक.
पिकनिकला येणार्या लोकांना आपण हाणून काय होणार रे..हे मुळात सुरूच झाले तेव्हाच उखडून काढायला हव होत रे …
अजुन मी गेलो नहि. पण एकदा जायलाच हवे…
पोस्ट छान झाली आहे.
धन्यवाद राजेंद्र…
नक्की जाउन ये..
khup divs jhale konta trek nahi ani post sudhaa nahi majhyakdun
navin varshat donhi goshti jomane karaychya ahet
post mast jhali ahe n vinanti khupch mahtvachi ahe.
हो रे विक्रम..लवकर लवकर पोस्ट टाक…
विनंतीपेक्षा अश्या लोकांना ठोकणे हाच उपाय दिसतोय मला…
गाजराचा हलवा खाल्ला ही काय मुद्दामहून सांगायची गोष्ट आहे का? : x
नवीन वर्षाची सुरूवात छान झाली…
हो रे मुद्दाम सांगायची गोष्टच तर होती…पोटभर खाल्ला रे
तुला पण खूप शुभेच्छा. कधी येतोस ट्रेक ला?
एक नंबर…
छान पोस्ट आहे.
खरंच एजॉयमेंट मी मिस करतो आहे.
परत मुंबईला आलो की नक्की जाणार…
धन्स नागेश.
नक्की मुंबईत आलास की करूच की सगळे
छान हलकी-फुलकी पोस्ट..
पण वाटेचे आणि सभोवतालचे अजून वर्णन यायला हवे सुहास..
आणि त्या शेवटच्या ठिकाणी आता शिडी लावली आहे हे माहीतच नव्हते. बाकी पायथ्याला शंकर मंदिरा शेजारी माझे एक ओळखीचे घर आहे. किमान १० वर्षे ओळख असेल…
कधीतरी तिकडे जायला हवे…
हो रे रोहणा नक्की प्रयत्न करेन मी अजुन खुलवुन लिहायला.
तुझ्याकडून हे कौशल्य घ्यायचय रे. थॅंक्स
मस्त मस्त .. धमाल केलीत तुम्ही लोकांनी.. नवीन वर्षाची सुरुवात ट्रेकने !! क्या बात है.. वर्ष चांगलं जाणार एकदम
..
शेवटच्या ठिकाणी शिडी लावलीये हे मलाही माहित नव्हतं.
हो चांगल घालवायचा प्रयत्न तरी नक्की राहील.
मला माहीत नाही पण कुणबी सेना असा काही तरी लिहल होत तिथे, कदाचित शीडी त्यांनी लावली असेल
छान झाली आहे पोस्ट. चांगली सुरुवात झाली आहे नवीन वर्षाची.
धन्यवाद दर्शना. तुला खूप खूप शुभेच्छा
मिसलो रे मिसलो…..
आता नेक्स्ट टाइम मिसू नकोस.
आता राजगड आहे १५-१६ ला …
शेवटी केलीली विनंती खूप महत्वाची आहे.
धन्यवाद प्रियांका
एकच नंबर…नववर्षाची अशी सुरूवात हवी!
हो भाई, पण ह्यावेळी आपला ट्रेक झाला नाही. पुढल्यावेळी विसरू नकोस..
मस्त पावसात ट्रेक करू
Mala Tumachi Hi Site Baghun KHup Anand Ahe , Khup Bare Vatale
Mi Khup Changale Comment Deu Shakat Nahi ,
Mala Tumacha Grupacha Membar Honyachi Ichaya Ahe.
निलेश, सर्वप्रथम ब्लॉगवर आपले स्वागत.
आमचा असा कुठला ट्रेक्कीग ग्रूप नाही… एखादा वीकएण्ड आला की फोनाफोनी करून ट्रेक ठरवायचा..बसस्स